शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंची हाकालपट्टी करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी /  शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्याचा सकारात्मक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला असताना कुलगुरूंनी खानापुरची जागा सूचवली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या कुलगुरूंची हकालपट्टी करावी, अशी मागणी विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीचे अॅड. अमित शिंदे यांनी केले. या संदर्भात राज्यपालांकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शिंदे यांनी दिला.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे यांच्याबाबत सुटा संघटनेने पुराव्यानिशी अनेक तक्रारी राज्यपालांकडे केल्या आहेत. विद्यापीठाचे उपक्रेंद्र सांगलीत व्हावे यासाठी सुधार समिती आणि अन्य संघटना गेल्या काही महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. जिल्हाधिकारी यांनीही तसा विद्यापीठाला प्रस्ताव पाठवलेला असताना कुलगुरुंनी खानापुरचा प्रस्ताव रेटला आहे.

विद्यापीठातील निर्माण झालेल्या सर्व शैक्षणिक प्रश्नांना कुलगुरुच जबाबदार आहेत. विद्यापीठाची पदवी एकाच सहीने असल्याचे आदेश असताना कुलगुरुंनी दोन सह्याचे पदवी प्रमाणपत्र काढून खर्च वाढवला. कुलगुरुंनी शिक्षण सल्लागार म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. हे सल्लागार नेमका कशाचा सल्ला देतात? यांना कुलगुरु म्हणून राहण्याचा अधिकार नाही. शिवाजी विद्यापीठात संशोधनाऐवजी कार्यालये नुतनीकरणावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. शिवाय विद्यापीठातील सर्व गैरकारभाराला कुलगुरुच जबाबदार आहेत. त्याची हकालपट्टी करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा सांगली जिल्हा शहर सुधार समितीच्यावतीने देण्यात आला.

इतर महत्वाचे –

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला फडणवीस सरकार जबाबदार – शरद पवार

गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांत उलटसुलत चर्चांना उधाण

एकदिलाने काम करून उदयनराजे भोसले यांना निवडून आणू – शिवेंद्रराजे भोसले

Leave a Comment