अमरावतीताज्या बातम्या

सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा

अमरावती प्रतिनिधी|  शिवसेना भाजप युती बडनेरा मतदारसंघाचेआमदार रवी राणा यांच्या मुळावर येणार असल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. कारण गतवेळी सेना भाजप स्वतंत्र लढल्याने रवी राणांचा विजय झाला. तर आता रवी राणा यांच्या समोर सेना भाजपची युतीच मुख्य अडथळा होत असल्याचे चित्र आहे. रवी राणा यांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्नेह चांगला आहे. त्यामुळे त्या मैत्रीचा फायदा त्यांना काही होणार का हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

शरद पवारांचे जवळचा नातेवाईक आणि राष्ट्रवादी आमदार असणारा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

२००४ पर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातला राष्ट्रवादीच्या सुलभा खोकडे यांनी खिंडार पाडले. शिवसेनेचे आमदार ज्ञानेश्वर धाने यांचा पराभव करून त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. सुलभा खोकडे यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर असे वाटू लागले की शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा बडनेरा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होणार. मात्र २००९ साली चित्रच वेगळे झाले. २००९ साली राजकारणात नवख्या असणाऱ्या रवी राणा यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष बाजी मारली. त्याचे झाले असे की २००४ साली निवडून दिलेल्या आमदार सुलभा खोकडे यांच्यावर लोक नाराज होते. शिवसेनेची देखील तशी पुरती तयारी झाली नव्हती. अशा स्थितीत रवी राणा यांनी अपक्ष तयारी सुरु केली आणि त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला.

२०१४ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढले. तर सेना भाजप देखील स्वतंत्र लढले. याचा फायदा रवी राणा यांना झाला. त्यांचे पारडे या निवडणुकीत जड राहिले. त्यांना मुख्य लढत दिली ते शिवसेनेचे उमेदवार संजय बंड यांनी. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यात टोकाची लढत झाली. मात्र शेवटच्या क्षणी मतमोजणीत रवी राणा यांचा अवघ्या सहा हजार मतांनी विजय झाला. यावेळी संजय बंड निधन झाल्याने त्यांच्या पत्नी प्रीती बंड या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार असणार आहेत. तर रवी राणा यांच्यासाठी युतीमुळे मैदान सोपे दिसत नसले तरी भाजपची छुपी मदत त्यांना मिळू शकते. त्यामुळे बडनेरा मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले

गिरीश महाजनांच्या पूर पर्यटनाचा विरोधांसोबत नेटकऱ्यांनी घेतला खरपूसर समाचार

शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावरच अमोल कोल्हेंना विचारला जाब ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उडाली धांदल

श्रावणी पदार्थ : अशी बनवा कारल्याची भाजी की नखाणाऱ्याला देखील खावी वाटेल

विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares