राज्यातील विधानपरिषदेच्या ‘या’ 5 जागांसाठी निवडणूक जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतींपासून विधान परिषदेपर्यंत सर्वच निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. ही कोंडी आता दूर झाली असून विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नागपूर, पुणे व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होईल. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. करोना संसर्गामुळे सुमारे ५ महिने ही निवडणूक लांबली आहे.

ऐन दिवाळीच्या उत्सवात निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होईल. १२ नोव्हेंबर रोजी नामांकनासाठी अखेरचा दिवस तर, १३ तारखेला छाननी होऊन १७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. १ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment