महाविकास आघाडी सरकारने ‘महापोर्टल’ केलं बंद; ४ नव्या कंपन्यांच्या माध्यमातून होणार भरती प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात ‘महापोर्टल’च्या माध्यमातून होणाऱ्या नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने आता हे ‘महापोर्टल’ स्थगित करत ४ नव्या कंपन्यांची भरती प्रक्रिया करण्यासाठी निवड केली आहे. निवड करण्यात आलेल्या सदर ४ कंपन्यांद्वारे पुढील ५ वर्षे पदभरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. लवकरच याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे.

शासनचा निर्णय काय ?
महापरीक्षा पोर्टल अतंर्गत येणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल करुन सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोवायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई (महा आयटी) यांच्याकडे देण्यात आली होती. त्या विभागानं निवड करुन सादर केलेल्या माहितीनुसार 4 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

१) मेसर्स अ‍ॅटेक लिमिटेड
२) मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रयाव्हेट लिमिटेड
३) मेसर्स जींजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड
४) मेसर्स मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड

या ४ कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी ५ वर्षांतील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, एमएपीएसीच्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट क च्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

दरम्यान, राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात झाली आहे. राज्यातील या महाभरती प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पोलीस विभागात 5 हजार 297 पदं आणि आरोग्य विभागात 8 हजार 500 अशा एकूण 13 हजार 800 पदांची भरती होणार आहे. आता ही संपूर्ण भरती प्रक्रिया राज्य सरकार महापोर्टलऐवजी या ४ नव्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करणार आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment