औरंगाबाद । ”मराठा आरक्षणाबाबत प्रयन्त करणारे काही जण राजकारण करत आहेत. जर त्यांना राज्य सरकार विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा”, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी वकील बाजू मांडण्यासाठी तयार आहेत, पण सरकारचा प्लॅन तयार नाही, असा आरोप काही मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यावर अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली. (Ashok Chavan On Maratha Reservation Hearing)
न्यायालयात वकील बाजू मांडण्यासाठी तयार आहेत पण सरकारचा प्लॅन तयार नाही, या आरोपांवर अशोक चव्हाणांना विचारले असता ते म्हणाले, “हे असं अजिबात नाही. यात काही जण राजकारण करत आहेत. जे कोणी असं बोलतं आहेत, त्यांनी स्वत:चा वकील लावावा. जर सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा,” असे अशोक चव्हाण म्हणाले.
मराठा आरक्षणाविषयीची सुनावणी संविधानिक पिठाकडे व्हावी
“सर्वोच्च न्यायलयात आज मराठा आरक्षण हा विषय सुनावणीसाठी येणार आहे. सरकारची हीच भूमिका आहे, ज्या घटनापीठाने मागील निर्णय हा आरक्षणासंदर्भातील हा संविधानिक पिठाकडे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजची सुनावणी ही या पिठाकडे न घेता ती संविधानिक पिठाकडे व्हावी, अशाप्रकराची आमची भूमिका आहे. तशीच भूमिका आज सर्वोच्च न्यायालयात घेतली जाईल. हा विषय संविधानिक पिठाकडे जावा, असाच युक्तीवाद केला जाईल,” अशी आमची भूमिका आहे, असेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं. “मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याची जी काही सुनावणी आहे ती या पिठाकडे नाही. संविधानिक पिठालाच याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे,” असेही अशोक चव्हाण म्हणाले.
नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील- अशोक चव्हाण
वाचा सविस्तर -👉 https://t.co/NXf6BmczXE@AshokChavanINC @NiteshNRane @meNeeleshNRane #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 27, 2020
गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर'… दसरा मेळाव्याप्रकरणी FIR झाल्यावर पंकजांची प्रतिक्रिय
वाचा सविस्तर -👉 https://t.co/d5s0C99t6W@Pankajamunde #HelloMaharashtra @BJP4Maharashtra #dasramelawa2020— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 27, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in