जितेंद्र आव्हाड ‘होम क्वारंटाइन’, कोरोना पोझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । वैद्यकीय तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला ‘होम क्वारंटाइन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत अन्य काही लोकांनीही सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. खुद्द आव्हाड यांनीही ‘होम क्वारंटाइन’च्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे कार्यरत असणारा एका पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच पूर्वकाळजी म्हणून क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसंच एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचाही समावेश आहे.

जितेंद्र आव्हाडदेखील या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. यामुळे त्यांनाही होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून बाधितांची संख्या १९८५ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आहेत. राज्यात आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला असून २१७ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment