चैत्र वारीसाठी कोणीही दिंडी पंढरीत घेऊन येऊ नका!वारकरी संप्रदाय पाईक संघाचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र वारीसाठी राज्य तसेच शेजारील राज्यातील भाविकांनी पंढरीत येऊ नये असं आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प.देवव्रत महाराज वासकर आणि महाराज मंडळीनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. करोनाचा संसर्ग फैलाऊ नये म्हणून लोकांची गर्दी टाळण्यासाठी राज सरकारने सर्व प्रार्थनास्थळ बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाला राज्यातील सर्व मंदिर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत मंदिर बंद ठेवली आहेत. यात पंढर्पुमधील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचाही समावेश आहे.

दरम्यान, येत्या ४ एप्रिलला चैत्र एकादशी आहे.वारकरी संप्रदायात आषाढ,कार्तिक,माघ आणि चैत्र या चार वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. दरवर्षी न चुकता या चारही वारीसाठी राज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने दिंडी घेवून पायी पंढरपूरात येतात. वारी चुकू न देण्याचा प्रमादच वारकरी संप्रदायात आहे. चैत्र वारीसाठी राज्यातून तसेच शेजारील कर्नाटक,आंध्रप्रदेश येथून भाविक येतात.चैत्र वारीसाठी पंढरीत जवळपास ३ ते ४ लाख भाविक येत असतात. मात्र सध्या देशावर करोनाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळं यंदाही हे भाविक चैत्र वारीसाठी गर्दी करू नये म्हणून महाराज मंडळीनी सर्वांना पंढरपूरात न येण्याचं आवाहन केलं आहे.

वारकरी संप्रदाय हा सकल मानवकल्याणाचा विचार मांडणारा संप्रदाय आहे. तर आपल्या कोणत्याही कृत्याने स्वतःच्या अथवा दुसर्याच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ ण्या या साठी चैत्र शुद्ध वारी करीता पंढरीच्या दिशेनं दिंडी अथवा वैयक्तिक कृपया येऊ नये अशी बंधू आणि भागीनिना विनंती आहे असे आवाहन ह.भ.प. देवव्रत महाराज वासकर यांनी केले आहे. ह.भ.प.देवव्रत महाराज वासकर, जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज ह.भ.प.चैतन्य महाराज देहूकर, श्रीसंत नामदेवरायांचे वंशज ह.भ.प.निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प.रामकृष्ण हनुमंत महाराज वीर,ह.भ.प.भाऊसाहेब महाराज गोसावी यांच्या उपस्थितीत बैठक घेवून वारऱ्यांनी पंढपूरात येऊ नये असे आवाहन केलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment