सातारा जिल्ह्यात 59 नवीन कोरोनाग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आरोग्य विभागाकडून काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 52, सारीचे 6 आणि प्रवास करुन आलेले 1 असे एकूण 59 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे बु. येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षाचे बालक, कोरेगाव येथील 30 व 36 वर्षीय महिला, वाठार किरोली येथील 17 वर्षीय तरुण, 31 वर्षीय महिला, नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष, चिमणगांव येथील 45 वर्षीय पुरुष, जावली पुनवडी येथील 47,34,55,48,55,47,42,50,61,47,62,व 40 वर्षीय पुरुष, कुसुंबीमोरा येथील 30 वर्षीय महिला, सातारा येथील 63 व 69 वर्षीय महिला, जिहे येथील 50,34,16 व 46 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचे बालक, रॉयल सिटी येथील 58 व 35 वर्षीय महिला व 8 वर्षाची मुलगी, यादोगोपाळ पेठ येथील 32 वर्षीय पुरुष, राधिका रोड येथील 58 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 28 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, करंदी येथील 36 वर्षीय महिला व 35 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील सरडे येथील 55 व 20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 39 वर्षीय महिला, विंचुर्णे येथील 43 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 65,23,45,70 व 32 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील परखंदी येथील 49 व 38 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला व 8 वर्षाचा बालक, नव्याचीडी येथील 72 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 33 वर्षीय पुरुष,4 वर्षाचे बालक व 34 वर्षीय महिला.

दरम्यान, जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ७४६ वर पोहोचली आहे. तर अात्तापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ३७ जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ६४४ अॅक्टीव कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment