नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC परिक्षेत ९९.८९% विद्यार्थी अपयशी! आता त्यांचं काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. पण यासोबतच अयशस्वी विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांनीही मेहनत केली होती. मात्र त्यांना यशाला मुकावे लागले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले नशीब अजमावत असतात. पण त्यातले सर्वच यशस्वी होत नाहीत. अपयशी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मागच्या वर्षी युपीएससी पास झालेले गिरीश यादव ज्यांना आयपीएस पोस्ट मिळाली होती ते सध्या तामिळनाडू येथे केडर म्हणून कार्यरत आहेत. आपल्या फेसबुक अकॉउंटवरून या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासोबतच व्यावहारिक ज्ञान ठेवा अशा आशयाची पोस्ट केली आहे.

नुकताच राज्य सेवेचा (MPSC चा) निकाल जाहीर झाला.प्रथमतः सर्व यशस्वीतांचे खूप अभिनंदन. पुढील दीड-दोन महिन्यात संघ लोक सेवा आयोगाचा (UPSC चा)निकाल पण लागेल.वर्तमान पत्रात बातम्या,social मीडिया वर पोस्ट सर्व काही तुम्ही बघितल असेल आणि पुढही बघाल.पास झालेल्या कित्येकांची नावे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील.अर्थात त्यामागे त्या सर्वांचे कष्ट आणि परिश्रम आहेतच.आणि ते तशा सत्कारास पात्र देखील आहेत.पण फक्त एवढंच पाहून मी पण UPSC/MPSC च करणार किंवा माझ्या मुलाला/मुलीला UPSC/MPSC करायला लावणार,असा विचार करत असाल तर थोड थांबा.सोबत जोडलेल्या फोटो मधील आकडे एकदा बघा.(०.००११% च्या ऐवजी ०.११% आणि ९९.९९% च्या ऐवजी ९९.८९% वाचा)

पाहिले तर दोन गोष्टी तुम्हाला हमखास जाणवल्या असतील/ जाणवतील:एक म्हणजे भयानक स्पर्धा आणि दुसरी माझ्यामते त्याहूनही भयानक म्हणजे राहिलेल्या जवळपास ९९.८९% मुलांचं,मुलींचा काय होतं,हा प्रश्न.

भाषणे, सत्कार बघून कोणताही जास्त विचार न करता आपण ठरवून टाकतो की मी पण UPSC /MPSC च करणार.सर्व काही विसरून अभ्यासाला सुरुवात होते.पहिल्या एक-दोन प्रयत्नात यशस्वी झालेले नशीबवान ठरतात.उरलेल्यांना मात्र जसे जसे attempt वाढत जातात,तसे तसे वास्तव दिसायला सुरुवात होते.यशाच्या राजमार्गात खाच खळगे देखील आहेत याची जाणीव व्हायला लागते.काहीजण यातून सावरून यशस्वी होतात, तर खूपजण नैराश्याच्या गर्तेत अडकून पडतात.4-5 वर्षांनंतर देखील हातात कुठलीच पोस्ट अथवा नोकरी नसते.यावेळी graduation शी पण काही संबंध राहिलेला नसतो.अशावेळी वाटायला सुरुवात होते की वेळीच दुसरी एखादी पोस्ट घ्यायचा अथवा इतर नोकरीचा (अर्थात backup plan चा) विचार करायला हवा होता.पण एव्हाना वेळ आणि वय दोन्हीही आपल्या बाजूने नसते.अशा खूप जणांची परिस्थिती मी माझ्या अभ्यासाच्या काळात पाहिलीय.त्या ९९.८९% मधील कितीतरी जणांची कहाणी थोड्या अधिक प्रमाणात सारखीच असेल.बिकट परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्यांची बरीच उदाहरणे आहेत आणि त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहेच,पण त्यांच्यासारखी मेहनत करून देखील यशस्वी न झालेल्यांचे प्रमाणसुुुध्दा खूप आहे.

शंभरातले 1-2 select होणार हे कितीही कटू असले तरी स्पर्धा परीक्षांच्या विश्वाचं सत्य आहे.त्यामुळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो,अभ्यास करा,प्रयत्न करा,पण एवढ करून देखील select नाही झाला तर काय करायचं याचाही प्लॅन तयार ठेवा.म्हणतात ना-“Hope for the best but prepare for the worst.”म्हणूनच स्पर्धा परीक्षांचा विचार करताना Backup Plan चा देखील विचार करा.आशावादाला प्रामाणिक प्रयत्नांबरोबरच थोडीशी का होईना व्यावहारिकतेचीदेखील जोड असुद्या.
शुभेच्छा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment