देशातील लॉकडाऊन वाढण्या आधी बच्चू कडूंकडून अकोल्यात संचारबंदी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला । देशव्यापी संचारबंदीचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. आता राज्यात संचारबंदी चालू राहणार की नियम शिथिल केले जाणार? असे काही प्रश्न असतानाच विदर्भातील अकोला जिल्ह्यात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील वाढते रुग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सध्या विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहे.

राज्यसरकारने अद्याप ३१ मे नंतरच्या संचारबंदीचे काही निर्णय घेतले नाहीत. राज्यात संचारबंदीचे नियम शिथिल होण्याची शक्यता आहे. मात्र अकोल्यातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन सरकारच्या निर्णयाची वाट न बघता जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ ते ६ जूनदरम्यान संचारबंदी चालू राहील असे जाहीर केले आहे. अकोला हा विदर्भातील हॉटस्पॉट बनला आहे. आतापर्यंत इथे सर्वाधिक ५०८ रुग्ण सापडले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

या काळात जिल्ह्यात रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी, विलगीकरण करून घेण्यापासून बचाव करण्यासाठी कोणतीच मुभा दिली जाणार नाही आहे. सर्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विलगीकरणाची तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाचे मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये काही चूक आढळली तर त्यांच्यावर कारवाईही केली जाणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. १ ते ६ जूनदरम्यान जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून केवळ औषध दुकाने आणि शेतीच्या काही कामांना सवलती दिल्या जाणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment