कौतुकास्पद !!! चहा विकणाऱ्या मुलास पोलीस कर्मचाऱ्याने केली मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीत काळात देशातील पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात राज्यातील पोलीस शिपायांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याच वर्दीतल्या लोकांकडून अनेकांना मदतीचा हात ही मिळाला होता. पोलीस दलाने या काळात अत्युच्य असे धैर्याचे काम केले आहे.पोलीस वर्दीतली माणुसकी अनेक वेळा पाहायला मिळाली आहे.

अनेक वेळेला कोण्या आजीला दवाखान्यात घेऊन जाणारा, आजोबाला आपला डबा देणारा, अनाथ लोकांना आश्रय देणारा तसेच अनाथांवर अंत्यसंस्कार करणारा अश्या वेगवेगळ्या स्वरूपात देवरूपी पोलीस कर्मचाऱ्यांना पाहिलं असेल , राज्याचे गृहमंत्री आपल्या पोलीस प्रशासनाचे वारंवार कौतुक करत असतात आणि त्यांना नवीन काम करण्यासठी ऊर्जा देत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचवून नवीन आव्हाने पेलण्याची जिद्ध तयार होत असते.

मुंबई येथील वरळी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले ओंकार व्हनमारे यांनी दादर येथे राहत असलेले १४ वर्षीय चहा विक्रेत्या मुलाला सर्व शैक्षणिक साहित्य घेऊन दिले. तसेच मोबाइल नंबर देऊन काही अडचण आल्यास आणि शैक्षणिक मदत हवी असल्यास केव्हाही कॉल कर असे सांगितले आहे. महाराष्ट्र पोलीस वर्दीतला माणूस या फेसबुक पेज वर याबाबत माहिती दिली आहे. आणि शेअर केली आहे. अनिल देशमुख यांनी पोलीस बांधवांच्या कामच कौतुक केले आहे आणि आपली ट्वीटर वरून याबाबत ओंकार च्या कामाचे आणि त्याच्या संवेदनशीलतेचा कौतुक वाटलं अस म्हंटल आहे.

परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते त्यावेळी जिद्ध जन्माला येत याचा प्रत्यय येत आहे. चहा विकणाऱ्या सागर याचे वडील केव्हाच देवाघरी गेले होते. वडिलांचे छत्र हरवल्याने आणि आईची तब्बेत ठीक नसल्या मुले त्याला चहा विकण्याचे काम करावे लागत होते. या कष्टाळू मुलाची जिद्ध आणि परिस्थिती ची जाणीव असणाऱ्या या मुलाचे तर कौतुक वाटलेच पण त्याला मदत करणारे पोलीस कर्मचारी ओंकार यांचेही कौतुक वाटले असे ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment