पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली होणार; भाजप नेत्याचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विधानसभा निवडणूकाकानानंतर मोठया सत्तानाट्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार या आठवड्यात एक वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र ठाकरे सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच पुन्हा एकदा हे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात होत असलेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली होतील, असे विधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपानेतेप्रवीण दरेकर यांनी केले आहे.

राज्यातील सत्तांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारामुळे राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे. त्याचे पडसाद होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून येतील. या निवडणुकीतील पाचही जागांवर भाजपाचा विजय होईल. तसेच तेथूनचा राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना सुरुवात होईल.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर हे जालना येथे आले होते. तेथे प्रचारसभा आटोपल्यानंतर दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी राज्यातील सरकार हे जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण या सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही, असा आरोप दरेकर यांनी केला. याशिवाय कोरोनाच्या संकटकाळात राज्याची अर्थव्यवस्था नीट हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही, असा टोला भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment