नागपूरची अंतरा बनली महाराष्ट्रातील पहिला महिला फायटर पायलट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । नुकताच इंडियन एअर फोर्स ट्रेनिंग एकेडमीचा दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी नागपूर येथील अंतरा मेहता यांची फायटर पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे. अंतर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. तर देशातील त्या दहाव्या महिला पायलट आहेत. फायटर स्ट्रीमसाठी निवडल्या गेलेल्या अंतरा या त्यांच्या बॅचच्या एकमेव महिला अधिकारी आहेत.

अंतरा यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजेच सीडीएसच्या परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर त्यांनी इंडियन एअर फोर्स ट्रेनिंग एकेडमीत प्रवेश घेतला. शनिवारी अंतरा यांनी हैदराबाद येथे झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभाग नोंदवला.

नागपूरच्या रिजनल पब्लिक रिलेशन ऑफिसरकडून याबाबत टि्वट करुन माहिती देण्यात आली आहे. अंतरा मेहता आता फ्लाएंग ऑफिसर झाल्या आहेत. अंतरा या माजी राष्ट्रीय बास्केट बॉल खेळाडू आहेत. त्यांना लहानपणापासूनच डिफेन्स मध्ये जाण्याची इच्छा होती. भविष्यात आपल्याला तेजस लढाऊ विमान चालवायला आवडेल असे अंतर यांनी सांगितले.

Leave a Comment