आमदार दुर्राणी यांच्या संपर्कातील पाच व्यक्ती क्वॉरंटाईन ; इतरांचा शोध चालू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

विधान परिषदेचे आमदार व राष्ट्रवादी पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्रानी यांना कोरोना संसर्गाची लागण झाली असल्याने आता आरोग्य विभागाकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतल्या जात आहे. याबाबत आता पाच संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे समजत आहे.

विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांना त्यांच्या नांदेड येथील भेटीनंतर अस्वस्थ वाटत असल्याची माहिती असून त्यानंतर त्यांनी १५ जुलै रोजी असणाऱ्या त्यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांना भेटण्यास परवानगी नाकारली होती. दरम्यान मागील सहा ते सात दिवसापासून आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी लोकसंपर्क टाळला होता. शुक्रवार १७ जुलै रोजी संध्याकाळी पाथरी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुमंत वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी जात तपासणी केली होती. याच वेळी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय झाला होता.

आमदार दुर्रानी यांना कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्यानंतर केलेल्या रॅपिड अॅन्टीजन्ट तपासणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती डॉ.सुमंत वाघ यांनी दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना कॉरन्टाईन करण्यात आले असून उर्वरित लोकांचा शोध चालू असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.

Leave a Comment