नागरी वस्तीत आढळलं अस्वल, तब्बल ३ तासानंतर बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी ।  शहरातील दुर्गापुर भागात घनदाट वस्तीत अस्वल आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जानगर-कोंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री आठच्या सुमारास ही अस्वल आढळल्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. अस्वलाच्या वावरा नंतर मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी जमली. गर्दीने घाबरलेल्या अस्वलाने शाळेच्या मागच्या भागात असलेल्या प्रसाधनगृहाच्या सांदीत आश्रय घेतला. वनविभागाच्या चमूने सुमारे ३ तास मेहनत घेत बेशुद्धीचे डार्ट मारून अस्वलाला बेशुद्ध केले.

यानंतर हे अस्वल पिंजऱ्यात बंद करण्यात आले. या भागात असलेल्या शक्तिनगर या वसाहतीत २ दिवस आधी या अस्वलाने धुमाकूळ घातला होता. तर दुसरीकडे लगतच्या कोळसा खाण परिसरातील शाळेतही अस्वलाने ठाण मांडले होते. आता हे अस्वल जेरबंद झाल्यानंतर त्रस्त असलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Leave a Comment