”संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत”; नारायण राणेंची जहरी टीका

मुंबई । शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहील या शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचा भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी समाचार घेतला. शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहणार? कोणत्या धुंदीत आहात?, असा सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. (bjp leader narayan rane attacks sanjay raut)

”काल संजय राऊत यांनी शिवसेना सत्तेतील ५ वर्षे पूर्ण करणार असं सांगितलं. त्यानंतर 25 वर्षे शिवसेना सत्तेत राहील असंही सांगितलं. दुसरीकडे आमचं सरकार पाडा असं आव्हानही दिलं. दिल्लीतून 200 कोटी आणा असंही म्हणाले. जणू काही दिल्लीतील नेते राऊत यांना विचारूनच निर्णय घेतात, अशा अविर्भावात ते बोलत होते, असा चिमटा राणे यांनी काढला. काय माणूस आहे हा? काय बोलतो? आधी म्हणतो 25 वर्षे राज्य करू, नंतर म्हणतो 5 वर्षे सरकार टीकेल. कोणत्या धुंदीत आहात? कोणत्या स्वप्नात आहात? की प्रियांका चतुर्वेदींनी काय पाठवलं?, असे सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक आहेत. चेष्टेचा विषय झाले आहेत,” अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

कोणताही नेता अशा प्रकारे वक्तव्य करू शकत नाही. पण आता ते बोलत आहेत. शिवसेना आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांची काम होत नाहीत. त्यामुळे शिवसेनेत असंतोष निर्माण झाला आहे. पुढच्या वेळेला तर 10-15 आमदारही निवडून येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : http://www.hellomaharashtra.in

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook