ऐकावं ते नवलंच! प्रेमापोटी घराची रचना केली कॅमेऱ्यासारखी, मुलांची नावेही कॅमेऱ्याचीच 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या व्यक्तीचे कोणत्या गोष्टीवर प्रेम जडेल आणि त्या प्रेमात तो व्यक्ती काय काय करू शकेल हे काहीही सांगता येत नाही. आपले छंद जपण्यासाठी लोक काहीही करतात. अशी अनेक उदाहरणे पाहण्यात आली आहेत. असेच एक गृहस्थ आहेत ज्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या प्रेमातून आपले घर चक्क कॅमेऱ्याच्या प्रतिकृतीत बांधले आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या मुलांची नावेही कॅमेऱ्याचीच ठेवली आहेत. त्यांना जेवढा कॅमेरा आवडतो तितका कदाचित जगात कुणालाही आवडत नसावा असे वाटावे असे हे सर्व काही आहे.

हल्ली सर्वांकडे कॅमेरा असतो, बऱ्याचजणांकडे महागडे खाजगी केमेरेदेखील असतात. पण, बेळगाव मधील रवी होंगळ यांचे घरच जणू कॅमेरा आहे. हे त्यांच्या कॅमेरा प्रेमामुळे जिल्ह्यात चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. मागील अनेक वर्षांपासून  ते हाच व्यवसाय करत आहेत. या व्यवसायात त्यांनी स्वतःला इतके समर्पित केले आहे की, प्रत्येक गोष्टीत त्यांना कॅमेरा डोळ्यासमोर येतो.  म्हणूनच आपल्या तीनही मुलांची नावे त्यांनी कॅनॉन, निकॉन आणि इपसॉन अशी ठेवली आहेत. इतकेच नाही तर त्यांना एक मुलगी सुद्धा हवी होती, पण ती होऊ शकली नाही. मात्र, तसे झाले असते तर तिचं नाव सुद्धा त्यांनी ठरवून ठेवले होते.

अगदी छोट्या छोट्या कामांची ऑर्डर घेत त्यांनी हा व्यवसाय मोठा केल्याचे ते सांगतात. आपले घर कॅमेऱ्यासारखेच असावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या पत्नीही त्यांना कामात मदत करतात. मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी ठेवल्याचे मुलांना अजिबात वाईट वाटत नाही. आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर देखील स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या फोटोग्राफीसोबाबत आता होंगळ यांना त्यांच्या या कॅमेरा प्रेमाने चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

Leave a Comment