कोरेगाव तालुक्यातील कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी |

रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोल्हापूर येथील 39 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित आल्याचे खाजगी प्रयोगशाळेने कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 78 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. त्याला उच्च रक्तदाब व श्वसन संस्थेचा त्रास होता.

दोन बाधित स्त्रियांची प्रसुती; बाळं लक्षणे विरहीत
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या जावली तालुक्यातील गावडी येथील कोरोना बाधित 26 वर्षीय गरदोर महिलेची प्रसुती 30 मे 2020 रोजी झाली असून बाळ व आई सुखरुप असून बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या माण तालुक्यातील बनवडी येथील कोरोना बाधित 25 वर्षीय गरदोर महिलेची 10 जून 2020 रोजी सकाळी सुरक्षित प्रसुती झाली आहे. बाळ व आई सुखरुप असून बाळ लक्षणे विरहीत आहे. डॉ. सुनिल एम. सोनवणे, स्त्री रोग तज्ञ वर्ग-1 व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment