धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेला ५०० मीटर ओढत; व्हिडीओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कोरोनाचे संकट सुरु आहे. देशातील रुग्णसंख्या ४ लाखाच्या पार गेली आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण फारसे नसले तरी अद्यापही लोकांच्यात संक्रमणाची भीती दिसून येते आहे. म्हणूनच अनेकठिकाणी मृतदेहांसोबत निर्दयी व्यवहार केला जातो आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका कोरोना रुग्णाचा मृतदेह जमिनीवरून ओढत नेला जात आहे.

कर्नाटकातील यादगीर या ठिकाणी ही घटना घडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा मृतदेह अत्यंत निर्दयीपणे ५०० मीटर ओढत नेण्यात आला आहे. दफन करण्यापूर्वी असा मृतदेह ओढत नेल्यामुळे या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.

पीपीई किट परिधान केलेले दोन वैद्यकीय कर्मचारी मृतदेह खेचत घेऊन जाताना या व्हिडिओत दिसत आहेत. प्रत्यक्षात गावकऱ्यांनी त्यांच्या गावात मृतदेह पुरण्यास नकार दिल्यानंतर वैद्यकीय कर्मचारी मृतदेह घेऊन गावाच्या बाहेरील भागात गेले. परंतु, त्यांनी मृतदेहांसोबत वाईट वागणूक केली. या घटनेनंतर डी. एम. कुलराम राव यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.आजच्या घटनेपूर्वीही असाच एक व्हिडिओ बेल्लारी येथून समोर आला होता. एकामागून एक 8 कोरोना पीडितांचे मृतदेह खड्ड्यात फेकण्यात आले होते. या सर्व घटनानंतर बेल्लारीचे उपायुक्त एस. एस. नकुला यांनी  चौकशीचे आदेश दिले आहेत. मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला असून त्याची दखल घेतली आहे. “आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत,” असे त्यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment