भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज- नितीन गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाचे संकट सरल्यानंतर भविष्यात मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमधून गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणं आवश्यक आहे. यासाठी मुंबई-पुण्याबाहेर स्मा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट र्सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. ते शनिवारी ‘झी २४ तास वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र एक पाऊल पुढे’ या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी गडकरी म्हणाले कि, भविष्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील लोकसंख्या कमी करण्याची गरज व्यक्त करत असताना मला भाषिक अथवा प्रांतीय राजकारण करायचं नसून या दोन्ही शहरातील गर्दी कमी होणं आवश्यक आहे. मुंबई आणि पुण्याला डिकंजेस्ट करण्याची गरज आहे.सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूचं संकट गंभीर बनलं आहे हे आपल्याला दिसतच आहे. त्यामुळे मुंबई बाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेज उभारणं आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले. महाराष्ट्राकडे मोठी क्षमता असून कोरोनाच्या संकटानंतरही महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.

याशिवाय समुद्रात आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याचं प्रमाणही कमी झालं पाहिजे, जेणेकरून पर्यटनासाठीही लोकं येतील, असं ते म्हणाले. महाराष्ट्राने कन्व्हर्जन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आणि कन्व्हर्जन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे. भविष्यात पर्यावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोलवरील वाहनं चालवण्यात यावी. यामुळे पर्यावरणाचे नुकसान कमी होण्याबरोबरच वाहतूक खर्च मोठ्याप्रमाणावर कमी होईल. याशिवाय, शेती आणि इतर क्षेत्रात महाराष्ट्राने अभिनव उपाययोजना राबवल्या पाहिजेत. सिंधुदुर्गातील विमानतळाचा नियोजनपूर्वक उपयोग केल्यास कोकणाचा चेहरामोहरा पालटू शकतो, असे यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment