शीतल आमटेंची कोरोनाविरुद्धच्या युद्धात उडी, वरोरा उपजिल्हा रुग्णालयात सेवेसाठी रुजू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रस्त्यावर पडलेल्या एका कुष्ठरोग्याला पाहून अस्वस्थ झालेल्या बाबा आमटेंनी आपले संपूर्ण आयुष्य आनंदवन फुलविण्यात घालविले. वडिलांच्या समाजसेवेचा वारसा जपत डॉ विकास आमटे आणि डॉ प्रकाश आमटे यांनी लोकसेवेचा पर्याय निवडला. त्यानंतरच्या पिढीनेही या कामातच आनंद मानला. आज स्व. बाबा आमटे यांची तिसरी पिढीही उत्स्फूर्त पणे समाजसेवेच्या कार्यात सहभागी होते आहे. कोरोनाच्या या संकटकाळातही हे कुटुंब सेवेसाठी तत्पर आहे. बाबा आमटे यांच्या नात शीतल आमटे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत covid- १९ च्या युद्धात योद्धा म्हणून सहभाग नोंदविला आहे. चंद्रपूर येथील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात त्या रुजू झाल्या आहेत. यासंदर्भातील ट्विट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज केलं.

Covid-१९ चे संकट सुरु झाल्यापासून त्या विविध मार्गानी लोकांचे प्रबोधन करण्याचे काम करत आहेत. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून वेबिनार च्या माध्यमातून त्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. covid-१९ काय आहे? त्याचे काय परिणाम होतात? कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे अशा अनेक संशयाचे त्या निराकरण आपल्या वेबिनार मार्फत करत आहेत. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना काही शिकवण्याची गरज नसते तर ते आपसूकच आपल्या मोठ्यांकडून शिकत असतात, आणि आमच्याबाबतीत तेच झाले असे नुकत्याच फेसबुकवर झालेल्या एका लाईव्ह मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. या कुटुंबाच्या आजपर्यंतच्या समाजाप्रती असणाऱ्या बांधिलकीबद्दल सांगावे तितके थोडे आहे. वेळोवेळी समाजाप्रती असणारी आस्था त्यांनी त्यांच्या कृतीतून व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय येतो आहे.

Leave a Comment