गडोखच गाठोड निकमाच्या डोक्यावर : रस्त्याच्या बांधकामात कोटी रुपयाला चुना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनीधी | महाबळेश्वर ते धामणेर याचैापदरी हमरस्त्याच्सा कामामध्ये टेंडर व अंदाजपत्रकाच्या नियमावलीला फाटा देत वृक्षतोड करुन तोडलेल्या झाडांच्या पाचपच झाडे लावने बंधनकारक असताना देखील गडोख याठेकेदाराने अभियंता निकम यांना मॅनेज केल्याने महाबळेश्वर धामणेर रस्त्याच्या बांधकामात कोटी रुपायला चुना लावली असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे . महाबळेश्वर ते धामणेर या ३१० कोटी रुपायाच्या रस्ता बांधकामात १३००झांडांची कत्तल झाली आहे . रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वर्षापासुन उभी असलेली झालेली गडोख ठेकेदाराकडुन नियम धाब्यावर बसवुन वृक्षतोड करण्यात आली आहे.

धामणेर ते महाबळेश्वर रस्त्याच्या दुतर्फा तोडण्यात आलेल्या १३०० झाडांचा मोबदल्यात पाच पट झाडे पुन्हा लावण्याची ठेकेदार कपनीने टेडरमध्ये मान्य केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याकरीता शासनाकडून महत्वपुर्ण भुमीका उपअभियंता निकम यांची आहे. मात्र ठेकेदार व अभियंता याच्यामध्ये सेटलमेंट झाले असल्याने गडोख ठेकेदार कपनीकडुन कोणतीही कार्यवाही अद्याप केली नाही. कोटी रुपये झाडाच्या पुनर्रबाधणीकरीता असताना मलई हाणण्याचा उद्योग सार्वजनिक बाधकाम विभागाच्या अभियंता व ठेकेदार कपनींचा सुरु असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.

महाबळेश्वर ते धामणेर रस्त्याच्या टेडरमध्ये नमुद असलेल्या सर्व मुलभुत बांबीना फाटा देत ठेकेदाराचे उखळ पाढरे करत कोटी रुपायाची टक्केवारी सार्वजनिक बाधकामविभागाचे एक्झीक्युटीव्ह अभियंता , उपअभियंता , यांचे हात भ्रष्ट्राचारात बरबटलेले असुन दर्जाहीन रस्त्याचे बाधकाम करुन लाली पावडर लावणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियत्याचा डाव आहे .

महाबळेश्वर ते धामणेर यादरम्यान ३१० कोटी रुपायाचे अंदाजपत्रक तयार करुन काम सुरु असले तरी टेंडर पेक्षा सर्व गोष्टी हपापाच्या गपापा करण्याचा उद्योग सार्वजनिक बाधकाम विभागाकडुन सुरु असताना रस्त्याचा दर्जा राखण्यातरीता इनडीपेन्डट इजिनिअर याकपनीला अधिकृत दर्जा दिला असताना सार्वजनिक बाधकाम विभाग , गडोख ठेकेदार , हे सगळे मिळुन वाटुन कोटी रुपये खाण्याचा उद्योग करत आहे . महाबळेश्वर ते धामणेर रस्त्यामधुन पोखरला गेलेला भ्रष्च्राचार कोणाकोणाचे हात बरबटलेले आहे हा संशोधनचा विषय आहे . टेंडर सोडुन नियमबाह्य काम करणार्या ठेकेदार कपनी व शासकीय अभियंता याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होवु लागली आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment