सोलापूरात घरातील खोल्या आणि शौचालयांवरून ठरणार होम क्वारंटाइनची संख्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांचा चढता क्रम पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोलापूरमध्ये आजपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका आयुक्तांनी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सोलापूरमध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना १७ दिवस घरातच होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जेवढी स्वतंत्र शौचालये आणि खोल्या असतील तेवढ्याच व्यक्तींना घरात क्वारंटाइन करण्यात येणार आहे. घरातील बाकी सदस्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे.

जारी केलेल्या नियमावलीनुसार कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना १७ दिवसांसाठी सक्तीनं होम क्वारंटाइन राहवं लागणार आहे. घरामध्ये स्वतंत्र खोल्या आणि शौचालयं नसल्यास त्या व्यक्तींनी विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. नेहमी सर्जीकल मास्कचा वापर करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी जणतेला दिल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयातील बेडची देखील कमतरता भासत असल्यामुळे ही उपाययोजना केली जात आहे.

दरम्यान, कोरोनासंबंधीक लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या कोविड कंट्रोल रूमसोबत संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तांनी केलं आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश असले तरी ठाणे आणि पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहेत. त्याचवेळी मुंबईतील आकडा कमी होताना दिसत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२  हजार ६१३  झाली आहे.

हे पण वाचा –

अखेर पाकिस्तानने घेतलं नमतं; कुलभूषण जाधव यांना भेटण्याची दिली परवानगी

COVID 19 मधून बरे झाल्यावर कमी होते शरीरातील अँटीबॉडीजची संख्या, दुसऱ्यांदा देखील होऊ शकते संक्रमण – जर्मनीच्या डॉक्टरांचा दावा  

धक्कादायक ! रुग्णालयातील मोफत wifi वापरून रूग्णाने डाउनलोड केले तब्ब्ल 80 हजार अश्लील व्हिडीओ

मोठी बातमी! आता ‘या’ बँकांमधील minimum balance आणि व्यवहाराचे नियम बदणार;१ ऑगस्टपासून लागू होणार ‘हे’ नियम

सावधान ! जर आपल्याकडे असतील एकापेक्षा जास्त बँकांमध्ये Saving Account तर होऊ शकेल ‘हे’ मोठे नुकसान

Leave a Comment