नियंत्रणात्मक उपाययोजनेसाठी परभणी जिल्ह्यात हुमणी भुंगेरे व्यवस्थापन अभियान सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे |

परभणी जिल्ह्यातील बऱ्याचशा गावात हुमणी किडींचे भुंगेरे मोठ्या संख्येने सायंकाळच्या वेळेला दिसून येत आहेत. त्यामुळे भुंगेऱ्यांचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर या वर्षी मोठ्या प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे क्रमप्राप्त झाले असून शेतकऱ्यांनी हुमणी भुंग्यांसाठी वेळीच नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक संतोष आळसे यांनी केले आहे.
ते पाथरी तालूक्यातील बाभळगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हुमणी भुंगेरे व्यवस्थापन अभियान शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

बाभळगाव येथे सोमवार ८ जुन रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे , विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.यु.एन.आळसे उपविभागीय कृषि अधिकारी सागर खटकाळे तालुका कृषि अधिकारी शिंदे आदी कर्मचारी यांच्या उपस्थितीत या अभियानास सुरुवात करण्यात आली .

यावेळी पेठ बाभळगाव शिवारातील बाभूळ , कडुलिंब , बोर , आदी झाडावरील भुंगे – याचे निर्मुलन करण्याचे प्रात्यक्षिक डॉ.आळसे यांनी दाखवले . तीन प्रकारे भुंगेरे नष्ट करण्याचा सल्ला ही यावेळी देण्यात आला . प्रकाश सापळे लावून , झाडावर किटकनाशकांची ( क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस २ मिली प्रती लिटर पाणी ) फवारणी करून व झाडं हलवून पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकुन ते नष्ट करावेत असाही कृषी सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. सोबत पेरणी करतांना मेटारायझीयम अनासोपली नावाची बुरशी ८-१० किलो / एकर किंवा फोरेट १० जी ८ किलो / एकर या प्रमाणात द्यावीत अशी शिफारस करण्यात आली.

दरम्यान जिल्हा कृषी अधिक्षकांनी सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना गावोगावी सायंकाळच्या वेळी जाऊन हुमणी भुंगे – यांबाबत शेतकऱ्यांना अवगत करून नियंत्रणाचे उपाय करण्याचे आदेश देत बीबीएफ ( रुंद वरंबा सरी ) चे प्रात्यक्षीत दाखवून प्रत्येक गावांत बीबीएफ वर पेरणी करण्यासाठी शेतक – यांना प्रोत्साहीत करण्याचे आवाहन केले आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment