औरंगाबादेतील करीना वाघिणीचा कोरोनामुळे मृत्यू?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील करिना नावाची सहा वर्षीय वाघीण काही दिवसांपासून आजारी होती. तिचा आज बुधवारी   सकाळी साडेपाच ते सहा वाजे दरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तिने अन्नपाणी सोडले होते. मनापा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या वाघिणीची मंगळवारी पाहणी केली होती. या वाघिणीची कोरोना चाचणीही करण्यात आली होती, मात्र त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील सहावर्षीय वाघीण करिना मागील दोन दिवसांपासून अन्न सेवन करीत नसल्याने प्राणीसंग्रहालयातील रुग्णालयात अंथरुणाला खिळली होती. तिला किडनीचा विकार असल्याचे मंगळवारी सायंकाळी उघडकीस आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तिच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. घाटी रुग्णालयात हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असले तरी  आहेत. मात्र अहवाल प्राप्त होण्याअगोदर तिचा मृत्यू झाला.

केंद्रिय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने तीन महिन्यांपूर्वीच प्राण्यांना सुद्धा कोरोना होऊ शकतो यादृष्टीने खबरदारी घ्यावी असे निर्देश महानगरपालिकेला दिले होते. रविवारी सायंकाळपासून करीना या वाघिणीने घेणे अन्नसेवन करणे बंद केले होते. तिला त्वरित प्राणिसंग्रहालयातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment