प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन

मुंबई । प्रख्यात शास्त्रीय गायक आणि संगितकार पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन झाले. अमेरिकेतील न्यूजर्सी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. त्यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी याची माहिती दिली. मेवाती घराण्याशी संबंध असलेल्या पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय गायन क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.

पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला. जसराज हे गेल्या 80 वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. मेवाती घराण्याचे पंडित जसराज यांचं सुरुवातीचं शिक्षण वडील पंडित मोतीराम यांच्याकडे झालं.

वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी गायक म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली.  तर २२ व्या वर्षी गायक म्हणून त्यांनी पहिला स्टेज शो केला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार
पद्मश्री – 1975
संगीत नाटक अकादमी पुरस्कार – 1987
पद्म भूषण – 1990
पद्म विभूषण – 2000
पु. लं. देशपांडे जीवनगौरव पुरस्कार – 2012
भारत रत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार – 2013
गंगुबाई हनगल जीवनगौरव पुरस्कार – 2016

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com