वीज बिलांची तपासणी केल्यास देय रकमेत वाढ झाल्याचं आढळलं नाही- उर्जामंत्री नितीन राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना लॉकडाऊन काळानंतर महावितरण आणि राज्यातील अन्य काही वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं देण्यात आली. यासंदर्भात वीज ग्राहकांमध्ये सध्या तीव्र नाराजी दिसून येत आहे. पण, वीज बिलांची तपासणी केल्यास मुळात वीज बिलांच्या देय रकमेचा आकडा वाढवलेला नाही, असं मत खुद्द राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडलं आहे. यावेळी त्यांनी नवी मुंबई येथे मनसे कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयात तोडफोड केल्याच्याच्या घटनेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

ग्राहकांची अवाजवी वीज बिलं माफ करावी अशी मनसेची मागणी आहे, खरं तर त्यांनी ही मागणी केंद्र सरकाकडे करावी असं त्यांनी थेट शब्दांत सांगितलं. आमच्यावर लावला जाणारा आक्षेप चुकीचा आहे असं म्हणत घरगुती ग्राहकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे, त्यामुळे त्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची बाब राऊत यांनी अधोरेखित केली.

केंद्रावर टीका
१० हजार कोटी अनुदान द्या अशी आम्ही मागणी केंद्राकडे केल्याचं म्हणत नितीन राऊत यांनी केंद्राला उद्देशून लिहिलेल्या पत्राचा मुद्दा मांडला. ग्राहकांना आणि लहान उद्योजकांना सवलतीनं वीज बिलं देण्याबाबतची मागणी या पत्रात करण्यात आली होती. पण, राज्याच्या उर्जा विभागाची ही मागणी धुडकावून लावल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. केंद्रानं ग्राहकांना लुटण्याचा कट रचला होता म्हणत, ‘लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरी बसावं आम्ही काळजी घेऊ असं केंद्र सरकार म्हणालं होतं. केंद्राने ९० हजार कोटी डिस्कॉमला देणार असे सांगितलं होतं, मात्र ते अद्यापही दिले नाहीत’, हा मुद्दा त्यांनी यावेळी मांडला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment