गुड न्यूज! राज्यातील जिम लवकर सुरु होणार; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती. याशिवाय भाजपा नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना जिम सुरु करण्यासंबंधी पत्र लिहिलं होतं. दरम्यान, ठाकरे सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. सर्व अटी-शर्थींचं पालन करुन राज्यभरात जिम सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचं जय वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं.

“राज्यातील जिम सुरु करावी अशी अनेक दिवसांची मागणी होतीच. गेल्या चार महिन्यात जिम व्यावसाय अडचणीत होता. आरोग्याच्या दृष्टीनेही अनेकांच्या समस्या आहेत. म्हणून सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांमध्ये या राज्यातील सर्व चालकांना नियमावलीचं पालन करत जिम सुरु करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आलं. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिम व्यवसाय बंद आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने लॉकडाउनचे निर्बंध शिथील करताना जिम सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र राज्य सरकारने त्यासाठी नकार दिला आहे. यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोल सुरु असून जिम सुरु कऱण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी होत होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment