‘रॉ’ चा अधिकारी सांगत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्याला अटक

औरंगाबाद प्रतिनिधी । देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ चा अधिकारी असल्याच्या थापा मारून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या चोरट्याला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र जप्त केले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. अभिजित पानसरे असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा नाशिकचा आहे.

दरम्यान पानसरे हा आपण आयपीएस अधिकारी असून देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या ‘रॉ’साठी काम करीत असल्याची थाप मारत होता. उच्चशिक्षित असलेला पानसरे हा हाय-फाय इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत होता. औरंगाबादमधील रहिवासी शरद किसनराव गवळी यांची अभिजित पानसरे याच्यासोबत २०१६ मध्ये अ‍ॅड. नितीन भवर यांच्या मध्यस्थीने ओळख झाली होती. त्यावेळी पानसरे याने आपण ‘रॉ’चे अधिकारी असून नासाच्यावतीने आपल्याला न्यूक्लिअर रियाकटर तयार करण्याचे कंत्राट मिळाले आहे, असे सांगितले. त्यासाठी पानसरे याने गवळी यांना नासाची बनावट कागदपत्रे, बनावट धनादेश दाखवून ते खरी असल्याचे भासविले होते. त्यावेळी पानसरे याच्यासोबत दोन सहकारी महिलादेखील होत्या.

अभिजित पानसरे याच्यावर विश्वास ठेवून शरद गवळी यांनी २० ऑक्टोबर २०१६ ते १२ ऑक्टोबर २०१७ या काळात दोन कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक पानसरे याच्या प्रकल्पात केली होती. त्यानंतर पानसरे हा वेळोवेळी गवळी यांना पैसे परत देण्यास टाळाटाळ करीत होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर शरद गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com