औरंगाबादमध्ये जेएनयू हल्ल्याचा विद्यार्थी काँग्रेसकडून तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध

औरंगाबाद प्रतिनिधी । दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी काँग्रेसतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन विद्यापिठातील वाय कॉर्नर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर करण्यात आले. यावेळी विद्यार्थी कांग्रेसचे पदाधिकारी आणि कार्येकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेत तोंडाला काळ्या फिती बांधून जेएनयूमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, योगेश बहादुरे, अक्षर जेवरीकर,विठ्ठल पाटील,अभिषेक कुलकर्णी,फहाद मोहम्मद, विष्णू कंदे,शंतनू धुमाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com