राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपचा धक्का ; शिवसेनेसोबत वाटाघाटी फसल्याने मतदारसंघात बदल

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

उस्मानाबाद प्रतिनिधी |  डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपने चांगलाच धक्का दिला आहे. त्याचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर नकरता त्यांची उमेदवारी तुळजापूर मतदारसंघातून जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना तुळजापूर या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावता येतो का हे बघण्यासारखे राहणार आहे.

युतीच्या सरकराच्या काळात जाणीवपूर्वक उस्मानाबाद जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवण्यात येत आहे असे सांगत राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्याचे चुलत बंधू आणि उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद मधून राणाजगजितसिंह पाटील यांना तिकीट मिळाले तरी आपण त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली. तर वाटाघाटीत शिवसेनेसोबत नजुळल्याने तुळजापूर या भाजपच्या पूर्वांपार हक्काच्या मतदारसंघातून राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी भाजपला जाहीर करावी लागली आहे.

राष्ट्रवादी राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा बदला घेण्यासाठी लालबुंद झाली असतानाच राणाजगजितसिंह यांना आघाडीत राष्ट्रवादीकडे असणाऱ्या उस्मानाबादमधून भाजपने उभाच केले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या मधुकर चव्हाण यांच्या विरोधात राणाजगजितसिंह यांना भाजपने दंड थोपटायला लावले आहेत.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

अनुभवी मिशीवाला उदयन भोसलेंना भारी पडणार का??

कसं काय पाटील बरं हाय का ? कोथरूड जिंकायचं खरं हाय का?

एका घरात दोन तिकिटे देण्यास भाजपचा नकार ; ऐनवेळी गणेश नाईकांचा गेम चेंज

ठाकरेंचा वारस पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात

चंद्रकांतदादा पाटील पुण्याच्या कोथरुड मधून लढणार विधानसभा?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook