दिलासादायक ! परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार असल्याची माहिती जायकवाडी विभागाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

शनिवारी जायकवाडी धरणातील आपात्कालीन दरवाजासह सर्वच्या सर्व २७ दरवाजे उघडल्यानंतर आज सकाळी ९ वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यातील हद्दीत पहीला असणाऱ्या ढालेगाव उच्च पातळी बंधारा यातून २लाख २८ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू होता. परंतु जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्या असल्याने व यात माजलगाव धरणातून ४ हजार ८०६ क्युसेक्स चा पाणी विसर्ग मिळत सकाळी ११ वाजता या ठिकाणी नदीपात्रातून २ लाख ९ हजार २७९ क्युसेक्स ( ५९२६.०८ क्युमेक ) प्रति सेंकद वेगाने पाणी वाहत आहे. सकाळी दहा वाजता जायकवाडी धरणातील पाणी साठा ९७ .९० % असताना पाण्याचा विसर्ग कमी करत ३७ हजार ७२८ एवढा करण्यात आला होता. अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे उपविभाग पाथरीचे अभियंता दिवाकर खारकर यांनी दिली आहे .त्यामुळे कालपेक्षा निम्म्याहून कमी पाणी विसर्ग चालू असल्याने परभणी व शेजारील जिल्ह्यातील गोदावरी किनारी भागातील पूर परिस्थितीचा धोका टळला आहे.

सकाळी अकरा वाजता गोदापात्रात चालू असलेला एकुण पाणी विसर्ग : जायकवाडी धरण ३७७२८, माजलगाव धरण ४८०६, ढालेगाव उच्च पातळी बंधारा ( परभणी ) २०९२७९, तारु गव्हाण उ .पा. बं( परभणी) २४९०८०, मुदगल उ .पा. बं. (परभणी) २३७९३० क्युसेक्स प्रति सेकंद .

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook