महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांच्या तालुका कार्यकारणीची निवड

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पाथरी तालुका पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड पाथरीतील शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवे व मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार कुलदिपके यांच्या उपस्थितीत करण्यात आली . शुक्रवार दि.3 जानेवारी रोजी आयोजीत कार्यकारणीच्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी प्रकाश साळवे तर विजय कुलदिपके यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मावळते अध्यक्ष आवडाजी ढवळे यांना निरोप देण्यात आला. नुतन पत्रकार संघाच्या तालूका कार्यकरणी मध्ये
तालुका अध्यक्षपदी पत्रकार नागनाथ कदम यांची एकमताने निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष दादाराव ढवळे, कार्याध्यक्ष आयुब खान शाहाबाज खान, सचिव विठ्ठल निसरगंध, सहसचिव गोविंद गोंगे, कोषाध्यक्ष शैलेश शामकूवर, संघटक अय्युब खान खैरू खान ,सल्लागार म्हणुन राजकुमार गायकवाड, एल आर कदम, आवडाजी ढवळे, शाम रणेर, आदीची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पाथरी तालूक्यातील सामाजीक, राजकीय, शैक्षणिक व राजकीय व्यक्तींनी स्वागत केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com