परभणी जिल्ह्यातील पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य शिबीर संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
जिल्हा रुग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ग्रामीण रुग्णालय पाथरी येथे ताणतणाव मुक्त मानसिक आरोग्य शिबीराचे आयोजिन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाथरी पंचायत समितीच्या सभापती कल्पना थोरात यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते हे होत . यासह नितेश भोरे,अल्ली अफसर अन्सारी,डॉ.जगदीश शिंदे ,डॉ रवि शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस .एन .वाघउपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, “तणाव ग्रस्त लोकांनी सतत कामे करणे टाळावीत व विश्रांती घ्यावी, दैनंदिन जीवनात सकारात्मक विचार करावा .व्यसनापासून दूर राहावे. ” असे आवाहन यावेळी उपस्थितांना त्यांनी केले. याशिवाय सरकारी दवाखान्यातिल वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती त्यांनी दिली.परभणी सामान्य रुग्णालयचे मनोविकार तज्ञ डॉ .तारेख अन्सारी यांनी नैराश्यग्रस्त , कामामध्ये लक्ष लागत नाही, जीवनात ताणतणाव वाढला आहे अशा समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी 104 या टोलफ्रि क्रमांकावर मानसिक आजार विषयी सल्ला घ्यावा असे आव्हान केले.

सदरील शिबीर यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालय पाथरीचे डॉ. राजेन्द्र वाकणकर, डॉ .आर. एस. जाधव, डॉ राजेंद्र कोल्हे, राजेभाऊ खेत्री, मधुकर खरात ,विक्रम धायजे , रामदास वडजे ,अशोक पाईकराव, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अहेमद अन्सारी, कदम ,दत्ता इंगळे, युनुस शेख सुरेश वाघमारे, अकबर पठाण, जोगदंड,सलीम शेख, शकील खान यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती .

Leave a Comment