मंत्री बाळासाहेब पाटील यांना मुंबईच्या ब्रिज कॅण्डी रुग्णालयात हलणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी 

राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, बाळासाहेब पाटील यांना मुंबईच्या ब्रिज कॅण्डी रुग्णालयात हलणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पाटील यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली.

”बाळासाहेब पाटील यांची तब्बेत व्यवस्थित आहे. परंतु त्यांना ब्लडप्रेशर व डायबिटीस असल्यामुळे मंगळवारी (दि. १८) सकाळी साडे सात वाजता मुंबईला हलविले जाणार आहे. कराड येथील कृष्णा रूग्णालयाचे डॉक्टर्स, त्याचे नातेवाईक यांच्या सामूहिक निर्णयातून बाळासाहेब पाटील यांना मुंबईतील ब्रिज कॅण्डी रुग्णालयात हलविले जाणार आहे” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, कराड येथील कृष्णा रूग्णालयात बाळासाहेब पाटील यांच्यावर कोविड पॉझिटीव्ह आल्याने उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी राजेश टोपे कराड येथील कृष्णा रूग्णालयात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखरसिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील व हॉस्पिटलचे वैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment