राज्यात मागील २४ तासात ११ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; ४१३ मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला नसून मागील २४ तासात मोठ्या संख्येत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात राज्यात 11 हजार 813 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज एका दिवसात 413 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासात 9 हजार 115 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 5 लाख 60 हजार 126 इतकी झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 3 लाख 90 हजार 958 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट 69.8 टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 49 हजार 798 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यातील कोरोना मृतांचा आकडा 19 हजार 63 इतका आला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.4 टक्के आहे.

आतापर्यंत राज्यात 29 लाख 76 हजार 90 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 लाख 60 हजार 126 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात 10 लाख 25 हजार 660 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 36 हजार 450 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment