VIDEO: ‘तो’ प्रसंग पाहून छत्रपती संभाजीराजेंनी शेतात जाऊन ओढलं तिफण; व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । राज्यात सध्या मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही बळीराजा पेरणीच्या कामाला जोमानं शेतात राबत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली परिसरातील एका शेतात अशीच पेरणी सुरू होती. त्यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी चक्क शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत तिफण ओढली. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

छत्रपती संभाजी राजेंनी आपला अनुभव ट्विटवर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले,’स्वतःच्या घामाने धरणी मातेला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला. मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला, असे संभाजीराजे यांनी सांगितले. कोरोनामुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही इतकंच नाही तर हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे अशी भावना संभाजीराजे यांनी ट्विटरवर व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment