पंतप्रधान मोदींनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांना दिर्घायुष्य लाभो आणि आरोग्यमय आयुष्य लाभो यासाठी मोदी यांनी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आज ट्विट करुन पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देशभरातून पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदींनीही पवार यांना ट्विटवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. #SharadPawar असा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंडींगला आहे

Leave a Comment