४०० वर्ष जुन्या वडाच्या झाडाला वाचवण्यासाठी नितीन गडकरींनी बदलला संपुर्ण रस्त्याचा नकाशा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोनाची साथ पसरली आहे . त्यामुळे जगभरात अनेकांना नैसर्गिक प्रकृती बाबत महत्त्व कळले आहे. भारत हा नैसर्गिकरित्या संपन्न आणि श्रीमंत देश आहे. नैसर्गिक विविधतेला भारतात खूप महत्व आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे झाडे, पशुपक्षी याबाबत भारतीय लोकांना अतिशय प्रेम आणि आपुलकी आहे.अशी अनेक उदाहरण आहेत की भारताचा आदर्श इतर देश घेत आहेत. त्यातच भारताने अजून एका नवीन आदर्शाची भर घातली आहे.

केंद्र सरकारच्या योजनेनुसार, महाराष्ट्रातील काही भागातून हायवे जाणार होता, परंतु तेथील आडव्या येणाऱ्या 400 वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडांसाठी हायवे चा नकाशा बदलला गेला आहे. ही जास्त अभिमानाची गोष्ट आहे.झाड वाचवण्याच्या मुद्यांवर सर्व पर्यावरण संघटना एकत्र येत झाड वाचविण्यासाठी प्रयत्न केले , त्याबाबतच्या बातम्या अगोदरच सोशल मीडियावर पसरल्या गेल्या होत्या.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील भोसे या गावातून केंद्र सरकारच्या रस्त्याचे काम केले जात होते . या गावात खूप जुने असे400 वर्षापूर्वीचे वडाचे झाड आहे. अनेक ठिकाणी हायवे चे काम करण्यासाठी झाडाची काटछाट करावी लागत होती. सर्व्हिस रोड चे काम करत असताना या वडाचे झाड पण काटले जाणार होते. त्याच कालावधीत काही पर्यावरणवादी संघटनेने त्यासाठी विरोध केला. आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मदतीतून त्यांनी 400 वर्ष जुने झाड वाचविले.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी याबाबत संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी इतक्या जुन्या झाडाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर या हायवे च्या नकाशामध्ये बदल करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आणि मग झाडाला वाचवले गेले.नैसर्गिक विवीधतेला जपत , यामध्ये आदित्य ठाकरे यांनी मोठी भूमिका बजावली . तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे या पंक्ती ला महत्व देत गडकरी यांनी पूर्ण हायवेच्या नकाशा बदलला. त्यामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment