पंढरपूरातील किर्तनकारांचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून अनेकांनी या प्रकरणी आपली मतं मांडली आहेत. इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा अनेकानी निषेध ही केला आहे तर आणि अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा वारकरी-फडकरी दिंडी समाज संघटनेने इशारा दिला आहे. याच विषयावर पंढरपुरातील कीर्तनकार व महाराज मंडळींची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत पाठिंबा देण्याबरोबरच त्याच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

महाराज मंडळी कीर्तन करताना धर्मग्रंथाचा आधार घेतल्याशिवाय कीर्तन करत नाहीत.त्यामुळे कीर्तनकार म्हणून आम्ही सगळे वारकरी फडकरी महाराज मडळी इंदुरीकर महाराज यांच्या पाठीशी आहोत असं कीर्तनकार मंडळी म्हणाली आहेत. ह.भ.प. ज्ञानेश्वर महारज जळगांवकर, ह.भ.प.प्रभाकर महाराज बोधले, ह.भ.प.माधव महाराज शिवणीकर यांच्यासह किर्तनकार महाराज मंडळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment