संविधान बचाव समितीच्या वतीन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात निघालेल्या मोर्चेकऱ्यांवर चुकीच्या पध्दतीने व दडपशाही करत गुन्हे दाखल केल्याचा आरोप करित संविधान बचाव समितीच्या वतीने पोलीसांचा निषेध नोंदवत ,दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

नागरिकता सुधारणा कायद्याअंतर्गत, या कायद्याला विरोध म्हणून संविधान बचाव समिती परभणी च्या वतीने मागील महीन्यात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात दगडफेक होत, गालबोट लागले होते.संविधान बचाव समितीच्या मते, या आंदोलनामध्ये नाहक जवळपास दहा ते बारा हजार आंदोलक कार्यकर्त्यावर पोलिसांनी सूड बुद्धीने गुन्हे दाखल केले आहेत. यातून सामान्य व्यक्तींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे आंदोलकांचे म्हणने आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांवरिल सुडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे परत घ्या अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Leave a Comment