पुण्याला आयुक्तांचं गिफ्ट! रविवारी दिली लॉकडाऊनलाच सुट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे ।  पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यामध्ये १० दिवसांचा लॉक डाउन उपमुख्यामंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून  जाहीर केला होता.त्यानुसार लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी शहरात सुरू  झाली होती. परंतु सलग पाच दिवस दुकाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एक दिवसाचा दिलासा  पालकमंत्र्यांनी दिला आहे.

 १३ जुलैपासून पुण्यात लॉक डाउन  जाहीर केला होता. गेले पाच दिवस पुण्यातील सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे उद्या कदाचित लोकांची खरेदी करण्यासाठी गर्दी वाढू शकते या शक्यतांचा विचार करत  उद्या दुकानं सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे. भाजीपाला, किराणा माल आणि चिकन- मटणची दुकानं आणि ठोक विक्री करणारी दुकानं सुरू ठेवण्यासाठी ही परवानगी महापालिकेने दिली आहे.  सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच खरेदी करण्याची संधी आहे . हि मुदत फक्त आणि फक्त रविवार पुरतीच असणार आहे . सोमवार पासून मात्र पुन्हा कडक लॉक डाउन असणार आहे. सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांना पुन्हा वेळेची मर्यादा करण्यात येणार आहे . अशी माहिती पुणे  महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उद्या  श्रावण सुरु होण्यापूर्वीच शेवटचा रविवार आहे. उद्या हा आखाड महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने लोकांकडून चिकन – मटणची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरेदी करताना लोकांनी गर्दी टाळणं आवश्यक आहे. महापालिकेकडून त्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी- चिंचवडलाही  उद्याचा  दिवस खरेदीसाठी देण्यात आला आहे. त्यानंतर मात्र तर 20 जुलै ते 23 जुलै दरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंतच  की आवश्यक वस्तू खरेदी करण्याची मुभा असेल.आज रात्री १२ वाजल्यापासून लॉक डाउन शिथिल करण्यात येणार आहे.

Leave a Comment