पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधी सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात येणार असल्या चेअसल्याचे वृत्त समोर आले आहे.

दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः ट्विटरवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं कि, ”थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील,” अशा शब्दांत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना आश्वस्त केले आहे.

पुणे शहरात काल दिवसभरात नव्याने ८०७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर पिंपरीत २७६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पुण्यातील रुग्णांची संख्या आता १९ हजार ८४९ झाली आहे. तर काल दिवसभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमुळे पुण्यात आत्तापर्यंत ६८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ६१९ जणांची तब्बेत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १२ हजार २९० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment