अबब!! पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली २५ हजाराच्या घरात; ७९० रुग्णांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यात आज एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४ हजार ५५८ झाली आहे. आज पर्यंत पुणे विभागात एकूण १ लाख ८३ हजार ७९८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १ लाख ७० हजार ६९१ इतके अहवाल आले आहेत. ४१०७ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. विभागातील १ लाख ४९ हजार ६५२ नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले असून २९ हजार ६९७ अहवाल सकारात्मक आले आहेत. दरम्यान यातील २४ हजार ५५८ रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत.

आजपर्यंत पुणे जिल्ह्यातून १४ हजार ४९४ रुग्ण बरे होऊन गेले आहेत. सध्या ९ हजार २७४ रुग्ण हे उपचार घेत आहेत तर आतापर्यंत ७९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये ४०५ रुग्ण गंभीर असून आयसीयू मध्ये आहेत. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अगदीच ३.२२% इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५९.०२% इतके आहे.

पुणे जिल्ह्यात रुग्ण बरे होत असले तरी रोज नव्याने रुग्ण सापडत असल्याने पुण्यात सामाजिक अलगावच्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे विभागात आज पुणे जिल्ह्यात १२३७, सातारा जिल्ह्यात ९५, सोलापूर जिल्ह्यात ८३, सांगली जिल्ह्यात १६ तर कोल्हापूर जिल्ह्यात १८ रुग्ण सापडले आहेत. विभागात एकूण १४४९ रुग्ण वाढले आहेत.

Leave a Comment