पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । गणेशोत्सव तसा महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा उत्सव आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. गणेशोत्सवातील पुण्याचा झगमगाट न्याराच असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात प्रसिद्ध असणारा पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. केवळ धार्मिक विधीच करण्यात याव्या असेही या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

Covid -१९ चा वाढता संसर्ग पाहता यावर्षी कोणतेच सार्वजनिक उत्सव साजरे करता येणार नाहीत. पुण्याचा गणेशोत्सवातील झगमगाट हा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो म्हणूनच देशात त्याची ख्याती आहे. पण यावर्षी मात्र हा झगमगाट साधेपणात बदलणार आहे. केवळ मंडप उभारून पूजा अर्चा, गणेश याग, मंत्र जागर, आरती यासारखे धार्मिक विधी करण्यात यावे. या दरम्यान सामाजिक अलगाव पाळून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी असे या बैठकीत सांगण्यात आले आहे. विसर्जन मिरवणूकीचे स्वरूपही परिस्थिती पाहून ठरविण्यात येईल. प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करून नियम व अटींचे योग्य पालन करावे असे या बैठकीत ठरले आहे.

Ganesh Chaturthi 2017: 5 Interesting Facts about Dagdusheth Halwai ...

या बैठकीमध्ये सर्व मंडळांनी नागरिक आणि मूर्तिकार यांना गणेशमूर्तीला मास्क न लावण्याचे आवाहन केले आहे. सध्याची स्थिती पाहता मास्क च्या गणेशमूर्ती बनविल्या जाऊ शकतात मात्र मूर्तीला मास्क लावून मूर्तीचे पावित्र्य भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन गणेश मंडळांनी नागरिकांना केले आहे. आकर्षक देखावे, विसर्जन मिरवणूका यांच्या माध्यमातून विविध संकल्पना मांडल्या जातात. मात्र यावर्षी विसर्जन मिरवणुका निघण्याची खूप कमी शक्यता आहे. कोरोनाचा परिणाम गणेश वर्गणीवर ही होणार असून कोणताच झगमगाट केला जाणार नाही आणि आम्ही गाभाऱ्यातच आरास करणार असल्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment