प्रचारानंतर राहुल गांधी उतरले थेट क्रिकेटच्या मैदानात, केली तुफान फटकेबाजी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । राहुल गांधी यांनी हरयाणातील रेवाडी या ठिकाणी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. राहुल गांधी सध्या हरयाणा येथे प्रचार करत आहेत. प्रचारासाठी जात असताना राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिग करावं लागलं. केएलपी कॉलेज या ठिकाणी हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आलं. त्यामुळे राहुल गांधी यांनी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

हरयाणा या ठिकाणी राहुल गांधी प्रचारासाठी आले होते. तिथून हेलिकॉप्टरने दिल्लीला जात असताना ढगाळ वातावरण आणि खराब हवामान यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅन्डिग करावे लागले. त्यावेळी राहुल गांधी यांनी क्रिकेटचा आनंद लुटला.

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत. महाराष्ट्रातही ते आले होते, मात्र महाराष्ट्रातला त्यांचा दौरा लगेचच आटोपला. हरयाणा या ठिकाणी असलेल्या महेंद्रगडमध्ये त्यांची प्रचारसभा होती. ती झाल्यावर राहुल गांधी परत निघाले होते. दिल्लीला हेलिकॉप्टरने जात असताना खराब हवामानामुळे केएलपी कॉलेज या ठिकाणी त्यांचे हेलिकॉप्टर उतरवावे लागले. ज्यानंतर राहुल गांधी यांनी क्रिकेटचा आनंद लुटला. राहुल गांधी बॅटिंग करत असतानाचा एक व्हिडीओही एएनआयने ट्विट केला आहे. यामध्ये एक स्टंप मागे लावून राहुल गांधी बॅटिंग करताना दिसत आहेत.

 

Leave a Comment