डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्ती झाल्यावर पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्यामुळे आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी राजेश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

नवलकिशोर राम यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या चांगल्या कामामुळे त्यांची नियुक्ती थेट पंतप्रधान कार्यालयात करण्यात आली. त्यानंतर आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदासाठी कोणाची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष होत. सध्या पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने या जागेवर अनुभवी अधिकाऱ्याला संधी दिली जाईल, असं बोललं जात होतं. त्यानुसारच राजेश देशमुख यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment