डॉ. रणजीत पाटील यांनी स्विकारला कराडच्या पोलीस उपअधीक्षकपदाचा कार्यभार; सुरज गुरव यांची पुणे येथे पदोन्नतीसुरज गुरव यांची पुणे येथे पदोन्नती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

संघटीत गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलेल्या कराडचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांची अखेर पुणे येथे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. सुरज गुरव यांच्या जागी डॉ. रणजीत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शनिवारी दुपारी पदभार स्विकारला.

डॉ. रणजित पाटील खोपोलीहून बदली होऊन कराड येथे येत आहेत. ते डायरेक्ट डीवायएसपी आहेत. पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव तडकाफडकी नागपूर येथे एक ऑक्टोबरला बदली झाली होती. त्यांच्या त्या बदलीला राजकीय झालर होती. त्यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी कराडमधील नागरीकांनी पाच ऑक्टोबरला मोर्चाही काढला होता.
गुरव यांनीही बदलीला आव्हान देण्याचा विचार केला होता. मात्र, त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार त्यांनी त्या बदलीला आव्हान देण्याचे विचार बदलला. त्यामुळे अवघ्या आठवड्यातच त्यांची नागपूर येथून पुन्हा बदली करण्यात आली. त्यातच सुरज गुरव यांना पुण्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागात अधीक्षक पद मिळाले आहे. सुरज गुरव यांच्या जागी डॉ. रणजीत पाटील यांची नेमणूक शासनाने केली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा त्या बदल्या नव्याने करण्यात आल्या आहेत. त्यात राज्यातील दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे. सुरज गुरव यांनी कराड व परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले होते. रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याची माहिती मिळाली की, पोलिसांचा चोप ठरलेलाच असायचा. गुंडाचे स्टेटस् ठेवले की, पोलिसांची पायरी झिजवायलाच लागायची, अशा डझनहून अधिक चांगल्या कारवाई केल्या होत्या.
याबरोबरच मोक्का, खून, चोरी आदींचे तपासही अव्वल करणार्‍या, गुंडांमध्ये वचक निर्माण करणार्‍या पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांच्या बदलीने मात्र खळबळ उडाली होती. पोलिस उपाधिक्षक गुरव यांची कराडला वर्षापूर्वी 22 सप्टेंबर 2019 मध्ये बदली झाली. येथे वर्षभराची कालावधी पूर्ण होतय त्याला चार दिवसही झाले नव्हते. तोपर्यंत त्यांची बदली झाली त्यांच्या जागी डॉ. रणजीत पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

Leave a Comment