एसटी बसेसवर आरटीओचं धाडसत्र सुरू,क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेण्याला बसणार चाप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यात एसटी बसेसवर आरटीओचं धाडसत्र सुरू केलंय. एसटीकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या तक्रारी नंतर जिल्ह्यात कारवाई सुरू झालीय. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी आढळणाऱ्या बसेसवर कारवाई सुरू केलीय.

आज सकाळपासून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गिरगाव परिसरातून मिरजकर तिकटी परिसरात येणाऱ्या बसेसची तपासणी केलीय या तपासणी दरम्यान त्यांना क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळून आले आहे. संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीनंतर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ही तपासणी मोहीम सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात मिरजकर तिकटी परिसरातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या बसची तपासणी करण्यात येत आहे

Leave a Comment