सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे रेकॉर्ड ब्रेक : तब्बल 106 पॉझिटिव्ह   

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी नव्या रुग्णांचे रेकॉर्ड बे्रेक झाले. तब्बल 106 नवे रुग्ण आढळले असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 79 रुग्णांचा समावेश आहे. मिरज येथील समतानगरमधील 57 वर्षाच्या बाधित पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 42 वर पोहोचली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

नव्याने सांगलीत 63 तर मिरजेतील 16 रुग्णांचा समावेश आहे. जत तालुक्यात पाच, आटपाडी व वाळवा तालुक्यात प्रत्येकी तीन, खानापूरमध्ये सहा, मिरज तालुक्यात सात, कडेगाव, शिराळा आणि तासगाव तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.  जिल्ह्यात आत्तापर्यंत 1214 रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत 538 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील 65 वर्षाचा पुरुष व 58 वर्षाची महिला आणि दापोली (रत्नागिरी) येथील 60 वर्षीय बाधित पुरुषाचाही उपचारावेळी मृत्यू झाला. मागील काही दिवंसापासून रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याशिवाय जुलैला सुरुवात झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढली असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.

जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी 106 रुग्ण आढळल्याने रेकॉॅर्ड बे्रेक झाले. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या अधिक असल्याचे अहवालात स्पष्ट झाले. सांगली शहरात तब्बल 63 तर मिरज शहरात 16 रुग्ण आढळून आले. महानगपालिका क्षेत्रात बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मिरज शहरातील समतानगरमधील 57 वर्षाच्या पुरुष बाधित आढळला होता. त्याच्यावर कोविड रुग्णालयात उपचार होते, मात्र त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाच्या बळींची संख्या 42 झाली.

याशिवाय मिरजेतील कोविड रुग्णालयात कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील 65 वर्षाचा पुरुष व 58 वर्षीय बाधित महिला, तसेच दापोली येथील 60 वर्षाच्या पुरुषावर उपचार सुरु होते. त्या तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.मिरज तालुक्यात सात रुग्ण आढळून आले. भोसे दोन, अंकली, दुधगाव, समडोळी, कसबेडिग्रज आणि माधवनगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. खानापूर तालुक्यात सहा रुग्ण आढळले असून विटा शहर आणि मादळमुठीमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण, जत तालुक्यातील रोजावाडी व आसंगी तुर्कमध्ये प्रत्येकी एक तर जत शहरात तीन रुग्ण, वाळवा तालुक्यातील वाळवा, आष्टा आणि शिगावमध्ये प्रत्येकी एक, आटपाडी तालुक्यातील नेलकरंजीतील दोन आणि तडवळेत एक रुग्ण आढळला.

कडेगाव तालुक्यातील शाळगाव, शिराळा तालुक्यातील कोकरुड आणि तासगाव तालुक्यातील चिंचणीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्व जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी तेरा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

Leave a Comment